Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

भाजपची पुणे शहर संघटनात्मक बैठक संपन्न

पुणे: भारतीय जनता पक्षाची पुणे शहराची संघटनात्मक बैठक आज शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत संघटनात्मक आढावा, आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी, दिवाळी निमित्त आयोजित करावयाचे स्नेहमिलन कार्यक्रम तसेच भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराच्या नूतन कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्याचे नियोजन अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी कार्यक्रमा दरम्यान वकील आघाडीच्या वतीने ॲड. संजय सावंत पाटील आणि रिक्षा आघाडी च्या वतीने नवले यांनी शहराध्यक्षांस प्रत्यक्ष भेटून विश्वास दिला…

आगामी काळातील महानगरपालिकेच्या निवडणुका संघटना म्हणून भारतीय जनता पार्टीसाठी महत्वपूर्ण असून गेली साडे चार वर्ष भाजपाच्या नगरसेवकांनी जी जनहिताची कार्ये केलेली आहेत ती विविध माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावी तसेच बूथ समिती यंत्रणा अधिक सक्षम करावी अशा सूचना या बैठकीत दिल्या.

यावेळी भाजपा शहर कार्यालयासाठी नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे यांनी आपल्या 5 वर्षांच्या पगाराचा 10 लक्ष रुपयांचा धनादेश व संदिप काळे, योगेश पिंगळे यांनीही निधीचे धनादेश दिले.

कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा वकील आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत पाटील, शहर सरचिटणीस गणेश घोष, शहर उपाध्यक्ष धनंजय जाधव, दत्ताभाऊ खाडे, दिपक नागपुरे, संदिप लोणकर, बापू मानकर, स्वरदा बापट, योगेश बाचल, सचिन मोरे, संदिप दळवी, संतोष खांदवे, प्रमोद कोंढरे, रवी साळेगावकर, पुनित जोशी, महेश पुंडे, जितेंद्र पोळेकर यांच्यासह शहर व मंडल पदाधिकारी व सर्व शहर आघाडी प्रमुख व मंडल आघाडी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply