दिवाळीसाठी प्रवीणचे सुगंधी उटणे ग्राहकांच्या सेवेत
दिवाळी म्हंटले की नवचैतन्याचा सण. अभयंगस्नान, त्याचबरोबर उठणे आणि सुगंधी वस्तूंची रेलचेल या दिवाळीला प्रवीण मेहंदीचे सुगंधी उटणे आणि इतर दर्जेदार उत्पादने ग्राहकांच्या सेवेत हजर झाली आहेत. दिवाळी म्हटलं तर प्रवीण सुगंधी उटणे शिवाय दिवाळी साजरी होणे हे अशक्यच. या दिवाळीमध्ये प्रविण मेहंदीवाल्यांचे विविध सुगंधी उत्पादनांची शृंखला ग्राहकांसाठी तयार आहे. तसेच गिफ्ट पॅक किट मध्ये प्रवीण सुगंधी उटणे, प्रवीण मेहंदी, प्रवीण सुगंधी स्पर्श, रॉयल टच साबण, बदाम तेल, गुलाब पाणी हे सर्व उत्पादनचा संच तयार केला आहे.
दिवाळीमध्ये उटण्याला खूप महत्व आहे. हे उटणे नागरमोथा, कपूरकाचली , दवणा, मरवा, वाळा ,आंबेहळद ,खस, तुळसी पावडर यासारखे आयुर्वेदिक जडीबुटी वनस्पती वापरून हे सुगंधी उटणे तयार केले गेले आहे. प्रवीणचे सुगंधी उटणे वापरल्यामुळे त्वचा तेजस्वी, कोमल आणि निरोगी होते. तसेच अंगावरील मळी काढण्यासाठी प्रवीण सुगंधी उटणे उपयुक्त आहे. उटण्याला विविध भाषा मध्ये उटणे , उबटन, पिटी, संदल, चिकसा संबोधित केले जातात. देवाची मुर्ती ज्यामध्ये पंचामृत करुन अभिषेक केले जाते, त्यासाठी प्रविण सुगंधी उटण्याचे वापर केले जाते.
प्रवीण सुगंधी उटणे तीन ही ऋतूमध्ये वापरल्यामुळे त्वचा फाटत नाही. निरोगी राहते आणि स्वस्त राहते. सर्वात महत्वाचे आयुर्वेदिक असल्याने लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सर्वजण याचा वापर करू शकतात. अशी माहिती प्रवीण मेहंदीचे प्रमोद ओसवाल यांनी दिली.
