Tuesday, July 28, 2026
Latest NewsPUNE

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास 14 डिसेंबरपासून प्रारंभ

पुणेः किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 14 डिसेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने
सुरुवात होणार असून महोत्सवाच्या निमंत्रण आरती किर्लोस्कर यांच्या हस्ते आज किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे आणि महोत्सवाची मध्यवर्ती कल्पना सांगणारी चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड, क्युरेटर डॉ. गुरुदास नूलकर, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते.
आरती किर्लोस्कर म्हणाल्या, हा महोत्सव प्रथमच आॅनलाईन पद्धतीने होत आहे.आपला अमूल्य निसर्ग वारसा जतन करण्यासाठी प्रभावी आणि अर्थपूर्ण संवाद व देवाणघेवाणीसाठी एक सामायिक व्यासपीठ उन्नत करण्याची संधी हा चित्रपट महोत्सव आपल्याला बहाल करतो. सकस अन्न समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज हा  महोत्सवाचा महत्त्वाचा मुख्य विषय आहे. या वर्षी किर्लोस्कर वसुंधरा च्या माध्यमातून समाजाचे आरोग्य निसर्गाचे आरोग्य आणि आपल्या अन्न व्यवस्थेची स्थिती या तीन पैलूंना केंद्रस्थानी ठेवून विविध चित्रपटांद्वारे हा महोत्सव सादर होणार आहे.
माधव चंद्रचूड म्हणाले, पर्यावरणाशी निगडित चित्रपट प्रसारित करण्याबरोबरच वन्यजीवन ऊर्जा हवा पाणी आणि पर्यावरण यांच्या अनुषंगाने चालणारे विविध उपक्रम व चित्रपट यांना स्थान देणारा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा एकमेव अद्वितीय असा महोत्सव आहे. सात राज्यातील तीस शहरांमधून आजतागायत आम्ही 250 पेक्षा जास्त महोत्सव आयोजित केले आहेत.
डॉ. गुरुदास नूलकर म्हणाले, समाजाचे आरोग्य निसर्गाचे आरोग्य आणि आपल्या अन्न व्यवस्थेची स्थिती या तिन्ही विषयांचा समावेश दृष्टीने वापर करून नव्या आजारांना प्रतिकार करण्याची ताकद निर्माण करणे जीवसृष्टी धारण करण्याची क्षमता वाढवणे आणि पुढच्या पिढ्यांसाठी आरोग्यपूर्ण पर्यावरण राखणे यासाठी शाश्वत उपाययोजनांचा शोध घेणे हा उद्देश आहे.सहभागींना ह्या क्षेत्रात झालेली नवीन संशोधने समजतील. त्यातूनच त्यांना सभोवतालच्या निसर्गाची अवस्था सुधारण्यासाठी अमलात आणता येणाऱ्या अनेक मार्गांचा देखील परिचय या महोत्सवाद्वारे होईल,
वीरेंद्र चित्राव म्हणाले,  या वर्षीचा महोत्सव चार दिवसांचा असेल. 14 ते 17 डिसेंबर असा या महोत्सवाचा कालावधी असेल.दररोज साडेचार तासांचे प्रक्षेपण असेल रोजचे प्रक्षेपण सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन तर पुनःप्रक्षेपण सायंकाळी 6 ते रात्री साडे दहा या वेळेत होणार आहे.
आपण खातो ते अन्न भोवतालच्या निसर्गाचे आरोग्य आणि निरोगी समाज यांचा एकमेकांशी असलेलं नातं विज्ञानाने ओळखलं आहे. या वर्षीच्या ऑनलाइन महोत्सवात, उद्घाटन समारंभ, तज्ञांचे मार्गदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, वसुंधरा सन्मान, कार्यशाळा, पॉडकास्ट, चर्चासत्रे, निसर्गसंवाद, चित्रपट, दृकश्राव्य व्याख्याने आणि समारोप समारंभ असा असणार आहे.
हा महोत्सव सर्वांसाठी विनामुल्य खुला असून नावनोदंणी आवश्यक आहे. सहभागी होऊ इच्छितांनी https://qr.page/g/ql50UFmvK या लिंकवर एकदाच नोंदणी करुन  संपूर्ण महोत्सवात सहभागी होऊ शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading