fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

नगरसेवकाचा शहरात सीसीटीव्ही बसविण्याकडे कल वाढला


पुणे: वॉर्ड स्तरीय निधीतून, तसेच स यादीतून नगरसेवक त्यांच्या इच्छेनुसार प्रभागात कामे करतात. त्यात कापडी पिशव्या वाटप करण्यापासून आता मास्क देखील खरेदी करत आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने नगरसेवकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याकडे कल वाढला आहे.
महापालिकेच्या मुख्य खात्यात शहरात 2995 सीसीटीव्ही लावले आहेत. मात्र, नगरसेवकांनी हजार ४६५ सीसीटीव्ही लावले आहेत.
पुणे महापालिकेच्या ऑक्टोबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत लेखी प्रश्‍नोत्तरातून ही माहिती समोर आली आहे. नगरसेविका वृषाली चौधरी यांनी यासंदर्भात प्रश्‍न विचारला होता.
शहरातील सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेने स्वतःच्या मिळकतींसह उद्याने, रस्ते, सीसीटीव्हीच्या नजरेत आणले आहेत. यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने सीसीटीव्ही खरेदी केले आहेत, पण ते केवळ प्रमुख ठिकाणीच असल्याने प्रभागातील गल्लीबोळ त्यात येत नाही. यासाठी नगरसेवकांनी प्रभाग निधीतून किंवा स यादीतून सीसीटीव्ही बसविण्यात सुरवात केली.

महापालिकेने शहरात ३ हजार ४६० सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यापैकी ९९५ सीसीटीव्ही विद्युत विभागाने तर २ हजार ४६५ सीसीटीव्ही नगरसेवकांच्या निधीतून क्षेत्रीय कार्यालयांनी बसविले आहेत. एकूण सीसीटीव्हींपैकी ३ हजार २०५ सीसीटीव्ही सुरू आहेत. तर २५५ बंद आहेत, असे लेखी उत्तरातून समोर आले आहे. सीसीटीव्हीचे नियंत्रण पोलिसांनाही देण्यात आले आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून, तसेच पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातूनही त्यावर नियंत्रण ठेवले जाते.


मध्यवर्ती भागात जास्त सीसीटीव्ही
शहरात सर्वाधिक ४११ सीसीटीव्ही शहराच्या मध्यवर्ती हे कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. त्यामुळे प्रमुख बाजारपेठ असलेल्या पेठा यामध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतर कोथरूडमध्ये २७१, बिबवेवाडी २६१, घोले-रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २३५, येरवडा क्षेत्रीय कार्यालय हद्दीत २५४, वानवडी १९७, वारजे १६५, औंध १५८, नगररस्ता १३४ लावले आहेत.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १००, सिंहगड रस्ता परिसरात ६७, हडपसर ५१,ढोले पाटील रस्ता ९१, कोंढवा-येवलेवाडी ३६, तर धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत फक्त ३४ सीसीटीव्ही लावले आहेत.


‘नगरसेवकांकडून सीसीटीव्ही लावण्यासाठी साधारणपणे १० लाखा पर्यंत तरतूद उपलब्ध होते. पण रस्त्यावर सीसीटीव्ही लावताना केबलचा खर्च वाढत असल्याने १० ते १२ कॅमेरे या तरतुदीत बसतात. कॅमेरा खराब झाला, बंद पडला, फुटला तर ठेकेदारास तो बदलून देण्यास सांगितला जातो.”

  • श्रीनिवास कंदुल, प्रमुख, विद्युत विभाग’

महिला सुरक्षेसह चोरीचे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांकडून सीसीटीव्हीची मागणी होत असते. आमच्या प्रभागात ड्रेनेजचे चेंबर चोरीला गेल्याने सीसीटीव्ही तपासले तेव्हा ते बंद असल्याचे समोर आले. प्रशासनाकडून देखभाल दुरुस्ती केली जात नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही बंद आहे अशी तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतःहून देखभाल दुरुस्ती करावी.”

  • वृषाली चौधरी, नगरसेविका

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading