Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

बांगलादेश मधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात पुण्यात आंदोलन

पुणे : बांगलादेशमधील हिंदूच्या अमानुष कत्तली करणा-या जिहादिंचा तीव्र निषेध… भारत सरकारने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी… अशा घोषणा देत पुण्यातील सारसबागेजवळील सावरकर स्मारक चौकामध्ये पतित पावन संघटनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे श्रीकांत शिळीमकर, मनोज नायर, गोकुळ शेलार, रवि भांडवलकर, स्वप्नील नाईक, दिनेश भिलारे, मनोज पवार, बाळा कांबळे, गिरीश काकड़े, गणेश जाधव, प्रवीण ठाकुर, राजाभाऊ बर्गे, अण्णा बांगर, राहुल पडवळ, माउली साठे, पियूष वाईकर, विश्वास ननावरे, अमर काकड़े, सूरज पोटे, अशोक परदेशी, राहुल शिंदे, विनायक रणदिवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाचे आयोजन संतोष गुरु व आकाश कोंढाळकर यांनी केले.

स्वप्नील नाईक म्हणाले, पुणे शहरात बांगलादेशी रहिवासी, रोहिंग्यां विरोधात कॉम्बिंग आॅपरेशन करणे गरजेचे आहे. पुण्यासह महाराष्ट्रात घुसखोरी केलेले रोहिंग्या बांग्लादेशी ना शोधून त्यांची हकालपट्टी करायला हवी. हिंदुंवरील अत्याचाराविरोधात वाढ होत असून त्याविषयी सरकराने त्वरीत दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे.

Leave a Reply