fbpx
Wednesday, April 24, 2024
ENTERTAINMENTLatest NewsTECHNOLOGY

अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी सोडवणार ‘केस नंबर ००२’

स्टोरीटेलवर दिग्गज साहित्यिकांसोबतच नव्यादमाच्या प्रतिभावंतांनाही विशेष स्थान दिले जात आहे. आपल्या मातृभाषेतील नवनवे साहित्य ऑडिओबुक्सद्वारे सातत्याने स्टोरीटेलवर निर्माण होत असून रसिकांचा प्रतिसादही अभूतपूर्व असा मिळत आहे. लेखिका सायली केदार यांच्या केस नंबर ००१ च्या पहिल्या सिझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर या मालिकेचा दुसरा सिझन प्रख्यात अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या आवाजात स्टोरीटेल मराठीवर प्रदर्शित होत आहे.

‘केस नंबर ००२’ विषयी लेखिका सायली केदार सांगतात “केस नंबरचा पहिला सिझन लिहिताना त्यावर मी आणि माझ्या पब्लिशर सई तांबेनी बरंच काम केलं होतं. श्रोत्यांना कसं खिळवून ठेवता येईल हे प्रत्येक एपिसोडमध्ये काटेकोरपणे बघत होतो. सिरीज रिलीज झाली तेव्हा आम्ही केलेल्या कामाबद्दल समाधानी होतो पण कसा response येईल याबद्दल खूप उत्सुकता होती. मात्र सिरीज भरपूर तास ऐकली गेली आणि comments चा, मेसेजेचा आणि emails चा पाऊस पडला. लोकांना ती गोष्ट खूपच आवडली आणि ती अगदी अनपेक्षितपणे बराच काळ best sellers मध्ये झळकली. अर्थातच दुसरा सिझन लिहीताना माझ्या स्वतःकडून आणि लोकांच्या या सिरीजकडून, त्या पात्रांकडून बऱ्याच अपेक्षा होत्या आणि आहेत. मुख्य पात्र इन्सपेक्टर निरंजन प्रभु हेच असल्याने आणि त्याची तपासाची, कामाची पद्धत तीच असल्यानी थोडा nostalgia सुद्धा सिझन २ मध्ये आहे. स्टोरीटेलच्या टीमबरोबर काम करणं ही खूपच enjoyable गोष्ट. आम्हाला काम करताना जशी मजा आली तशीच श्रोत्यांनाही ऐकताना मजा यावी येईल.”

गीतांजली कुलकर्णी यांनी या सीरिजला आवाज दिला आहे, त्यांच्या या अनुभवाबद्दल त्या म्हणाल्या “‘केस नंबर ००२’ चा अनुभव यासाठी चांगला होता कारण की सई आणि सायली दोघीही खूप मन लावून काम करतात. आम्ही एकत्र मिळून खूप चर्चा केल्या, त्या खूप इनपुट्स देतात, त्यामुळे असं नाही वाटत कि तिथे आपण फक्त आहोत तिथं. आपल्याला मदत करायला खूप लोकं असतात. आणि छोट्या छोट्या गोष्टींकडेसुद्धा लक्ष देतात. हे पात्र तसंच साउंड नाही ना होत आहे, वेगळं वाटतंय ना? तर त्यामुळे काम करताना जे सुरुवातीला अस्पेशिअली गरज असते. कि आपल्याला एक्झॅक्टली पात्राचा आवाज त्याच्या टेम्प्रामेंटप्रमाणे त्याचं बोलणं ठरवायचं असतं. तेव्हा मदत झाली खूप सईची आणि सायलीची. आणि नंतर अर्थातच तुम्हाला अंदाज येतो आणि मग तुम्ही फाईंडआऊट करता कि कसं असेल हे पात्र आणि तुम्ही करत जाता. हे एक टीम वर्क आहे. केस नंबर ००२ मधील थरार, भीती, प्रेम प्रसंग, असे अनेक प्रसंग आणि त्यातील भाव रेकॉर्ड करताना मला फार मजा आली. ऑडिओबुक रेकॉर्डिंगची प्रोसेसच मला मेडिटेटिंग वाटते”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading