Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

गणेश काकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

पुणे : हडपसर ब्लॉक काँग्रेस कमिटी मधील केशवनगर येथे गणेश काकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आदरणीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून केशवनगर परिसरातील महिलांना दिवाळी भेट म्हणून प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते साडीवाटप करण्यात आले.
काँग्रेस पदाधिकारी व केशवनगर ग्रामपंचायतचे माजी सदस्य शक्ती प्रधान यांच्या वतीने मा. नाना भाऊ पटोले यांच्या हस्ते केशवनगर मुस्लिम दफणभूमीच्या विकासाकरिता एक लाख रुपये किमतीचा चेक देण्यात आला.
माजी आमदार  मोहन जोशी,  अभय छाजेड, NSUI प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, नगरसेवक अविनाश बागवे, संगिता तिवारी, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, ब्लॉक अध्यक्ष प्रा शोएब इनामदार, प्रदीप परदेशी उपस्थित होते.
केशवनगर भागातील रमेश राऊत, रॉबर्ट डेव्हिड, नयनेश शिनलकर, राजू भंडारी, रवी गागडे, नूरचाचा शेख, ऍड. निलेश गौड यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply