Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पुढील आठवड्यात देशातील विविध भागात परतीचा पाऊस बरसण्याची शक्यता

पुणे : पुढील आठवड्यात देशातील विविध भागात परतीचा पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे 26 ऑक्टोबर पासूनचे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. प्रामुख्याने उत्तरपूर्व प्रदेशांमध्ये म्हणजेच ईशान्य मान्सून सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या प्रदेशातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परतीचा पाऊस आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधील काही भागात हा पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, परतीचा पाऊस महाराष्ट्रातही काही भागात जोमाने बरसू शकतो. प्रामुख्याने पूर्व विदर्भात हा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोकणात पाऊस पाठीमागील काही दिसांपासून शांत झाला आहे. पावसाने चांगलीच उघडीप दिल्यामुळे रत्नागिरीकराना कडक उन्हाचा सामना करत आहेत. महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटची तीव्रता चांगलीच जाणवत आहे. सर्वसाधारणपणे सकाळी सकाळी 30 ते 31 अंशापर्यंत असणारा तापमानाचा पारा दुपारपर्यंत चांगला 35 अंश सेल्सियसच्या पुढे जाऊ लागला आहे. परंतु हवामान खात्याच्या इशाऱ्या नुसार येत्या आठवड्यात या परिस्थितीत काहीशी बदलेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading