Tuesday, July 28, 2026
Latest NewsPUNESports

पुणे जिल्हा अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अर्णव भाटिया, अमेय सुतागट्टी विजयी

पुणे : पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्यावतीने आयोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पुणे जिल्हा अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात अमेय सुतागट्टी, अर्णव भाटिया या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर संघर्षपूर्ण विजय मिळवला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत अमेय सुतागट्टीने एस अनुरागचा टायब्रेकमध्ये 6-5(7-4) असा पराभव केला. चुरशीच्या लढतीत अर्णव भाटियाने सय्यम पाटीलला टायब्रेकमध्ये 6-5(7-3) असे पराभूत केले.  सिद्धांत थोरवेने अर्णव कुलकर्णीचा 6-2 असा सहज पराभव केला.

मुलींच्या गटात चौथ्या मानांकित अस्मि टिळेकर व श्रेया होंकन यांनी अनुक्रमे यशविका दास व प्रिया शर्मा यांचा 6-0अशा सारख्याच फरकाने पराभव केला. तसेच, या स्पर्धेत जिल्ह्यांतून एकूण 177 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 14 वर्षाखालील मुले: 

अमेय सुतागट्टी वि.वि.एस अनुराग 6-5(7-4);

त्रिशिक वाकलकर वि.वि.लेशा नायडू 6-1;

सुमय माहुली वि.वि.आयुश बच्छाव 6-0;

सिद्धांत थोरवे वि.वि.अर्णव कुलकर्णी 6-2;

अर्णव भाटिया वि.वि.सय्यम पाटील 6-5(7-3);

14 वर्षाखालील मुली:

मनस्वी वाकोडे वि.वि.राशी सोनावणे 6-0;

श्रेया होंकन(12) वि.वि.प्रिया शर्मा 6-0;

अस्मि टिळेकर(4) वि.वि.यशविका दास 6-0;

ह्रितीका कापले(3) वि.वि.एस प्राची 6-0;

मृणाल शेळके(8) वि.वि.समृद्धी काटे 6-4;

रितिका मोरे वि.वि.शर्मिष्ठा कोंडरे 6-0;

आर्या बोराडे वि.वि.आदीश्री जोशी 6-3;

सुहाना कन्नन(14) वि.वि.पलाक्षी राऊत 6-1.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading