प्रसिद्ध डिझायनर लेबल ‘गिनी वाधवा कोतुर’चा नवा स्टुडिओ कोरेगाव पार्कमध्ये सुरू
पुणे : प्रसिद्ध डिझायनर लेबल ‘गिनी वाधवा कोतुर’चा नवा स्टुडिओ येथील कोरेगाव पार्कमध्ये लेन ५ मध्ये सुरू झाला असून त्याचे उद्घाटन आज दिमाखात झाले. गिनी वाधवा या ‘ब्राईड्स गिनी’ या नावाने प्रसिद्ध असून त्यांनी रचना केलेल्या नववधूच्या पोशाखांना (ब्रायडल वेअर) व संग्रहांना भरघोस लोकप्रियता लाभली आहे. गिनी वाधवा यांनी ११ वर्षांपूर्वी आपल्या स्वप्नाला मूर्त रुप देण्यासाठी फॅशन डिझाईन व्यवसाय सुरू केला आणि त्याचाच एक भाग म्हणून वर्ष २०१६ मध्ये एनआयबीएम परिसरात पहिले स्टोअर सुरू केले. आता हेच स्टोअर नव्या रुपात कोरेगाव पार्कमध्ये स्थलांतर झाले आहे.
गिनी वाधवा हे भारतातील प्रख्यात फॅशन लेबल आहे. स्वतःला फॅशन ब्रँड म्हणून स्थापित करण्याच्या निश्चयाने गिनी यांनी कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींच्या पाठबळावर एका लहानशा खोलीतून व्यवसायाचा प्रवास सुरू केला. आज त्यांचा ब्रँड दर्जा व आगळेपणासाठी ओळखला जातो. उंची दर्जाच्या टेक्सचर्ड कापडावर मेहनतीने केलेल्या अत्यंत नाजूक व कलाकुसरीच्या कामातून त्यांनी दोन अशक्यप्राय गोष्टींचा संगम आपल्या वस्त्ररचनांत घडवला आहे.
नव्या स्टोअरबाबत सहर्ष प्रतिक्रिया देताना गिनी म्हणाल्या, “आमच्या लेबलच्या बाह्याकृती या उत्तम प्रतीच्या, साध्या, अनोख्या व व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य असतात तरीही त्यात उच्च दर्जाच्या फॅशनचा आविष्कार दिसून येतो.’ प्रत्येक व्यक्तीमध्ये सौंदर्य असते आणि नेमकी हीच बाब ओळखून गिनी आपल्या ग्राहकांचे मन जाणून घेतात व त्यात लपलेल्या कल्पनांना वाव देतात. त्याचे अचूक प्रतिबिंब गिनी यांनी डिझाईन केलेल्या वस्त्ररचनांत दिसून येते आणि त्यामुळेच या फॅशन्स लोकप्रिय झाल्या आहेत. व्यवसायात सर्वोत्तम स्थान मिळवण्याच्या आकांक्षेने मेहनत केल्यामुळेच गिनी यांचा हा ब्रँड आवड, कल्पकता, अनोखेपणा व दर्जा या वैशिष्ट्यांनी प्रख्यात ठरला असून लोकांना भावतो. कपडे म्हणजे केवळ डिझायनरची निर्मिती नसावी तर त्यामुळे व्यक्तिमत्त्व खुलावे, ही गिनी यांची धारणा असून त्या ग्राहकांच्या दृष्टीकोनांचे रुपांतर त्यांच्या सर्वोत्तम फॅशन रचनांत घडवतात. या रचनांमधून सर्व वयोगटांतील व सर्व ठेवणींच्या समकालीन भारतीय महिलांच्या वस्त्रशैलीविषयक गरजांची सुंदर परिपूर्ती होते.
गिनी यांना नववधूच्या पोशाखांची रचना करायला खूप आवडते. या कामातील व्यामिश्रता आणि प्रयोगासाठीचा वाव ही कारणे त्यामागे आहेत. याबाबत बोलताना त्या म्हणतात, ‘नववधूच्या पोशाखांची रचना खूपच रंजक असते आणि त्याच्याशी संबंधित प्रवास मला खूप आवडतो कारण विवाहाच्या दिवशी नववधूच्या मनात स्वतःबाबत विचार सुरू असतात, भावनांचा कल्लोळ असतो आणि त्याचवेळी तिला या अत्यंत खास दिवशी वेगळे व सर्वोत्तम दिसावे अशी आसही असते.’ नववधूच्या मनातील हा गोंधळ बुजवून तिच्या कल्पनांच्या आधारे गिनी सुंदर व परिपूर्ण पोशाख बनवतात व या सर्जनशील निर्मितीचा आनंद घेतात. त्यांच्या ब्रायडल कलेक्शनमध्ये विविध लेहेंगे, शेरवानी, फ्युजन गाउन, इंडो-वेस्टर्न आउटफिट आदींची विशाल श्रेणी समाविष्ट आहे. त्यांची प्रत्येक कलाकृती अनोखी व अजोड ग्लॅमरने युक्त असते. यामागील प्रेरणेविषयी बोलताना गिनी म्हणतात, ‘ग्राहकांसाठी वस्त्रप्रावरणांची रचना करताना त्यांच्याशी केलेल्या चर्चेतूनच मला माझ्या कामाची प्रेरणा व ऊर्जा मिळते. एखाद्या नववधूला विवाहाच्या खास दिवशी तिने कसे दिसावे आणि तिला कसे जाणवावे यावरच सर्वकाही अवलंबून असते.’
गिनी या त्यांच्या वस्त्ररचनेतील फ्युजन वर्क, काठांवर नाट्यपूर्ण व असममितीय रेषांच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची डिझाईन्स सुस्पष्ट व नाजूक तपशील, प्रवर्धक व भरतकामाने सुशोभित असतात.
या स्टोअरमध्ये आपला नवा वस्त्र संग्रह सादर करण्यास गिनी वाधवा सज्ज झाल्या असून त्यात गाउन, सारी ड्रेप, जंपसूट, काफ्तान व जॅकेट यांच्या वैविध्यपूर्ण रचना आहेत. ग्राहकांची फ्युजन, ट्रॅडिशनल, वेस्टर्न यापैकी कोणतीही स्टाईल असो, त्यातील मनपसंत रचना या संग्रहात नक्कीच असतील, असे गिनी यांनी नमूद केले.
