fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsSports

दोशी इंजिनियर्स करंडक -पुना क्लब संघाचा दुसरा तर, पीवायसीचा पहिला विजय

 
पुणे, 21ऑक्टोबर 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पुना क्लब संघाने दुसरा विजय, तर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पहिला विजय नोंदविला.
 
पुना क्लब मैदानावर झालेल्या लढतीत डावखुरा जलदगती गोलंदाज विश्वराज शिंदे(5-29)याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पुना क्लब संघाने मेट्रो क्रिकेट क्लब संघाचा 57 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना रेहान खान(3-29), निशांत नगरकर(3-46), मिरझा अकिब(2-46)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे पुना क्लब संघाचा डाव 46.1षटकात सर्वबाद 191धावावर संपुष्टात आला. यामध्ये ओंकार आखाडे 39, शंतनू खेनात 26, हर्ष ओस्वाल 26, सागर बिरदावडे 21, मेहुल चहल 19, रौनक ढोलेपाटील 18 यांनी धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मेट्रो क्रिकेट क्लब संघाचा डाव 31.4षटकात 134 धावावर संपुष्टात आला. यामध्ये प्रशम गांधी 50, यश बारगे 21, गुरवीर सिंग सैनी 18 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पुना क्लबच्या विश्वराज शिंदेने 29 धावात 5 गडी बाद, तर अमेय मुजुमदारने 18धावात2गडी, ओंकार आखाडे(1-29), सागर बिरदावडे(1-21)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
वीरांगना क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत साहिल छुरी(50धावा व 1-20)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा 113 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 50षटकात 7बाद 285धावा केल्या. यात आदित्य लोंढेने 63 चेंडूत 5चौकार व 3षटकारासह 59धावा व श्रेयश वाळेकरने 72चेंडूत 6चौकारासह 53धावा केल्या. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 100 चेंडूत 101धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर साहिल छुरीने 30चेंडूत 4चौकार व 3षटकारासह 50धावा व नचिकेत वेर्लेकरने 32धावा, रोहित जनाने 22धावा, साहिल मदनने 17 धावा काढून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. याच्या उत्तरात केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा डाव 37.3षटकात 172धावावर कोसळला. यामध्ये प्रद्युम्न चव्हाण 38, हर्षल काटे 25, आर्यन गोजे 21, सिद्धेश वरगंटे 20 यांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. पीवायसी संघाकडून आदित्य डावरे(3-28), नचिकेत वेर्लेकर(3-37) यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.  सामनावीर साहिल छुरी ठरला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading