Saturday, September 26, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

बँक ऑफ महाराष्ट्रावर भरदिवसा सशस्त्र दरोडा; शिरूर तालुक्यातील घटना

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रावर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये आज दुपारी दिडच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत बँकेतील रोख रक्कम आणि सोने लांपास केले आहे. दरोडयाचा हा संपूर्ण थरार cctv मध्ये कैद झाला आहे.

पिंपरखेड गावातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये आज दुपारी दिडच्या सुमारास पाच दरोडेखोर आले. त्यांनी निळ्या रंगाची जीन्स, जॅकेट, कानटोपी व मास्क घातला होता. काही कळण्याच्या आत दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकून निघून गेले. घटनेची माहिती कळताच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे.

मिळालेल्या प्रार्थमिक माहितीनुसार, दरोडेखोर हे 25 ते 30 वयोगटातील होते. ते सिल्व्हर रंगाच्या मारुती सीयाज गाडीतून आले होते. तसेच या गाडीवर प्रेस असे लिहिली होते. अन् दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोरांनी नगरच्या दिशेने पलायन केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading