fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

पुणे : शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका 31 वर्षीय विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका 21 वर्षाच्या विवाहित महिलेने तक्रार दिली असून कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2017 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत फिर्यादीच्या घरी आणि कोंढवा परिसर हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी समीर बाळू निकम (वय 31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समीर हा शॉर्टफिल्म बनवण्याचा व्यावसाय करतो. त्याने काही गाणी देखील तयार केली आहे. शॉर्ट फिल्म मध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने विवाहित महिलेशी ओळख वाढवली.
या बहाण्याने त्याने पीडित विवाहितेसोबत वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. कोंढवा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading