Thursday, July 30, 2026
Business

 ‘सेक्सी बीस्ट’ या ई-कॉमर्स व्यासपीठाने भारतीय बाजारपेठेत निर्माण केली हवा

पुणे :  लाऊंजवेअर आणि स्लीपवेअर क्षेत्राने भारतात गेल्या काही वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वृद्धी नोंदविली आहे. त्यातही ग्राहकांची प्राधान्ये बदलत राहिली आहेत.  सेक्सी बीस्ट हे एक लेझरवेअर, लाऊंजवेअर आणि अंतर्वस्त्र यांची विक्री करणारे ई-कॉमर्स व्यासपीठ असून हा ब्रँड विश्वास आणि आत्मविश्वास देवू करतो. डिसेंबर २०२० मध्ये स्थापना झाल्यावर या कपड्यांच्या ब्रँडने दर्जा, आकर्षक डिझाईन आणि सर्वोत्तम आरामदायी अनुभव ग्राहकांना देवू केला आहे.

‘सेक्सी बीस्ट’ हा ब्रँड आपली अनोखी, दमदार व रंगतदर डिझाईन यामुळे वेगळा ठरतो. आज या ब्रँडच्या उत्पादन रेंजमध्ये ३० हूनही अधिक डिझाईन आहेत. मोठी प्रिंट आणि रंग हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक राज राणा यांनी स्वतः अगदी विचारपूर्वक तयार केली आहेत.

वीण व स्पर्श यांचा विचार करता या ब्रँडने ‘सुपर कोम्बड प्रीमियम कॉटन’चा वापर करून आपली उत्पादने अगदी मऊशार बनवली आहेत. ही उत्पादने घरून काम करत असताना किंवा घरी-कार्यालयात काम करत असतना आणि अगदी आरामदायी क्षणांसाठीसुद्धा अनुरूप आहेत. लाउंज बॉक्सर आणि पायजमा हे झोपताना, घराच्या बाहेर आणि अगदी पार्टीमध्येसुद्धा वापरता येतात. स्लायडर हे घरात आणि बाहेर वापरता येतात तर टीज हे घरात आणि बाहेर वापरता येवू शकतात.

‘सेक्सी बीस्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राज राणा म्हणाले की, गेल्या एका दशकात आम्ही बाजारपेठेमध्ये आवश्यक उत्पादने ते फॅशन स्टेटमेंट असे स्थित्यंतर पाहिले आहे. आमची अशी धारणा आहे की सगळीकडे लोक त्यांच्यातील अंतर्गत उर्मिला व्यक्त करण्यासाठी झटत असतात. आमची उत्पादने या उर्मिला अलगद आणि विश्वासाने वाव करून देतात. आमच्या किमती आणि स्थान यांमुळे आमची उत्पादने ‘किफायतशीर किमतीत ऐषारामी अनुभवा’च्या कक्षेत जावून बसतात. त्यामुळे आमच्या कक्षा याआधीच रुंदावल्या आहेत. कुमारवयीन (जेन झेड) आणि  व २३ ते ३८ वर्षे वयोगटातील युवक (मिल्लेनियल्स) या वयोगटापासून सुरुवात होवून आमची उत्पादने आता जेन एक्स (चाळीसी ते साठीतील ग्राहक) ग्राहकांमध्येही विस्तारली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading