कोकण विभागाचा ओबीसी जागर अभियान मेळावा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न
ठाणे : जुलमी राज्यसरकारने जाणीवूर्वक ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो. तसेच या सरकारच्या विरूध्द एल्गार करून आम्ही समस्त ओबीसी समाजाला त्यांचे राजकीय अस्तित्व कोण संपवू पाहत आहे याचा जागर करतोय.
ही लढाई आमच्या अस्तित्वाची असून, जो पर्यंत आमचे राजकीय आरक्षण पूर्ववत होणार नाही तो पर्यंत ही लढाई सुरूच राहील.
यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर ,केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील,माजी मंत्री हंसराज भैया अहिर,माजी मंत्री संजय कुटे,माजी मंत्री राम शिंदे,माजी मंत्री जगन्नाथ पाटील,आमदार किसन कथोरे,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार निरंजन डावखरे,आमदार गणपत गायकवाड,आमदार कुमार एलानी,भटके विमुक्त आघाडी चे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र पवार,प्रदेश भाजपा उपाध्यक्ष माधवी नाईक,भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील,जिल्हा अध्यक्ष सारंग मेढेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
