पुण्यातील सर्व दुकाने रात्री 11 तर हॉटेल रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार
पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तिसरी लाट आली नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली असल्याने राज्य शासनाकडून निर्बंध शिथील केले जात आहेत. आता दुकानांच्या वेळाही वाढविल्या आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने आजपासून रात्री 11 वाजेपर्यंत तर हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सर्व दिवस रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.
याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज काढले आहेत. तर, महापालिका क्षेत्रातील अम्युझमेंट पार्क, संग्रहालय, इंडस्ट्रीज शुक्रवारपासून सुरु होतील. यामध्ये फक्त मोकळ्या जागेतील कोरड्या राईड्स साठी परवानगी राहील, पाण्यातील राईड्ससाठी मनाई आहे. हे आदेश पुणे, खडकी कॅन्टोन्मेंट मंडळालाही लागू राहणार आहेत.
