Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांनी कॉलेजकडे पहिल्याच दिवशी पाठ फिरविल्याचे चित्र

पुणे : पुण्यात आज पासून महाविद्यालय खुली झाली असली तरी विद्यार्थ्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद पहायला मिळाला नाही. विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांनी कॉलेज कडे पाठ फिरविल्याचे चित्र आज पुण्यात पाहायला मिळाले. कोरोनाच्या दोन डोसची पूर्तता आणि तोंडावर आलेल्या दिवाळीमुळे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शहरातील सर्वच महाविद्यालय खुली करण्यात आली. परंतु कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट चित्र आज दिसत आहे. त्यामुळे बहुतेक महाविद्यालयांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिकवण्या चालू ठेवल्या आहेत. पुण्यातील एच  व्ही देसाई कॉलेजमध्ये फक्त तीन विद्यार्थीच उपस्थित होते. 

दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांचे दोन डोस पूर्ण नाहीत, अनेकांचे 18 वर्ष वय पूर्ण नसल्याने ते लसिकरणात सहभागी होऊ शकत नाहीत. पुणे शहरात इतर जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतो परंतु विद्यार्थी वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे पाठ फिरवली आहे. तसेच येत्या काही दिवसात दिवाळी सण आल्याने अनेक विद्यार्थी गावकडून परतलेलेच नाहीत.   

अशी आहे नियमावली महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी

  1. कोरोना प्रतिबंध लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार
  2. महाविद्यालयात असेल ५० टक्के उपस्थिती मास्कचा वापर अनिवार्य
  3. वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय,महाविद्यालयांना उपलब्ध करून द्यावी लागणार
  4. विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आवाहन 

Leave a Reply