Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

ईद ए मिलाद निमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

पुणे : महमद पैगंबर जयंती ईद ए मिलाद व आयुब शेख यांच्या वाढदिवसानिमित्त येरवडा परिसरातील गरीब ,कष्टकरी व झोपडपट्टी तील नागरिकांना आज मोफत आरोग्य तपासणी ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया , चस्मे वाटप तसेच महारक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिराचे विशेष म्हणजे रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस मोफत पाच लाख रुपयाचे आरोग्य विमा कवच देण्यात आले .येरवडा परिसरातील नागरिकांनी या शिबिरास प्रचंड गर्दी केली होती.

या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी उपमहापौर ,नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते करण्यात आले .धेंडे यावेळी म्हणाले की , कोरोणा मुळे संपूर्ण जगाचे लक्ष हे स्वतःच्या आरोग्याकडे वेधले आहे .सद्ध्या आरोग्य सेवा ही अत्यंत महत्त्वाची बाब समजली जात आहे .त्यातच झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून आयुब भाई शेख यांनी समाजाला एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचे मत डॉ.धेंडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या कार्यक्रमास नगरसेविका फरजाना आयुब शेख ,माजी उपमहपौर डॉ.सिद्धार्थ धेंडे,आयुब शेख , रीपबलिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे ,शैलेश चव्हाण ,अशोक कांबळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ,या शिबिरास परिसरातील कार्यकर्ते ,युवक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply