Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्योग-व्यापार सेल,महिला आघाडीच्या वतीने ‘दिवाळी फेस्टिव्हल’ प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे शहर उद्योग-व्यापार सेल आणि महिला आघाडी यांचे वतीने पुणेकर नागरिकाना दिवाळीविषयक उद्योग-व्यापार मध्ये संधी देण्यासाठी एक “दिवाली फेस्टिवल” प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येथे घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक सभागृहाच्या प्रांगणात २८ ते ३० ऑकटोबर दरम्यान होणार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे शहर उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष भोलासिंग अरोरा यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. दिवाळीसाठी लागणारे साहित्य,पदार्थ आणि इतर गोष्टींचे स्टॉल मांडण्यात येणार आहे.नवउद्योजक,गृहिणी आणि युवकांसाठी काही स्टॉल राखीव ठेवण्यात आले असून त्यासाठी ९३२५४७०८४७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply