Sunday, September 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण : आर्यन खानचा जामीन पुन्हा फेटाळला; अभिनेत्री बरोबरचे ड्रग संबधित व्हॉट्सअॅप चॅट सापडले

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज आज पुन्हा एकदा मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. आर्यन खान याच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान,  न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी सदर प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.

एएनआयच्या अहवालानुसार, एनसीबीने म्हटले आहे की, आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅट्स न्यायालयात सादर केल्या आहेत. “पोलिसांना ड्रगशी संबधित व्हॉट्सअॅप चॅट सापडले आहेत जे कथितपणे आर्यन खान आणि एक पदार्पण अभिनेत्री यांच्यात आहेत,”

दरम्यान, मुंबई क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक कऱण्यात आली आहे. अटकेनंतर गेल्या 8 ऑक्टोबर पासून म्हणजेच 13 दिवसांपासून आर्यन खान हा मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आहे. यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी सुद्धा आर्यन खान याचा जामीन आर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून न्यायालयाने पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading