Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

के. एस. प्रशांत यांची द सॉफ्टवेअर एक्सपोटर्स असोसिएशन ऑफ पुणे च्या अध्यक्षपदी निवड

पुणे : द सॉफ्टवेअर एक्सपोटर्स असोसिएशन ऑफ पुणे अर्थात सीपच्या अध्यक्षपदी के. एस. प्रशांत यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर निवड करण्यात आली. के. एस. प्रशांत हे आयडीया एस (IDeaS) रेव्हेन्यू सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक असून केपीआयटी टेक्नोलॉजीजचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. याआधी प्रशांत यांनी सीपच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य म्हणून काम पहिले आहे.

याबरोबरच संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीमध्ये पर्सिस्टंट सिस्टिम्सच्या अॅडमिनीस्ट्रेशन विभागाचे सरव्यवस्थापक विद्याधर पुरंदरे यांची उपाध्यक्ष पदी, नाईस लि. कंपनीच्या प्रोडक्ट मॅनेजमेंट विभागाच्या संचालिका सीमा जोशी यांची सचिव पदी तर सायटेल स्टॅटीस्टिकल सॉफ्टवेअरच्या वित्त विभागाचे उपाध्यक्ष आनंद रानडे यांची खजिनदार पदी निवड झाली. शिवाय नितीन देशपांडे, एस. रामाप्रसाद, आशुतोष पारसनीस, अश्विन मेघा, स्वप्नील देशपांडे, अभिजित अत्रे, पराग बर्वे, नितीन कुलकर्णी, शिवराज साबळे आणि विनिता गेरा हे कार्यकारिणीचे सदस्य म्हणून २०२१ – २०२३ दरम्यान काम पाहणार आहेत.

के. एस. प्रशांत यांनी सीओइपी या पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयामधून फिल्ड ऑफ स्टडी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन या विषयात पदवी संपादन केली असून उटाह विद्यापिठामधून आपले एम एस (मास्टर इन सायन्स)चे शिक्षण पूर्ण केले. स्टॅण्डफर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ बिझिनेसमधून त्यांनी एक्झिक्युटिव्ह लीडरशिप प्रोग्रॅम देखील केला आहे. नजीकच्या भविष्यात पुण्याच्या तंत्रज्ञान परिसंस्थेशी जुळवून घेत काम करीत असताना सहयोगी संस्था व सदस्य यांच्या सहकार्याने सीप यापुढे कार्यरत असेल अशी ग्वाही प्रशांत यांनी या वेळी दिली.

Leave a Reply