Wednesday, November 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘घेतला वसा टाकू नको’मधून अमृता धोंगडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजीकडून किंवा आईकडून ‘एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी रहत होता’ या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या आहेत.  याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रक्षकांना मालिकारूपात ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रातून पाहायला मिळत आहेत. नुकतंच प्रेक्षकांनी नवरात्री विशेष भाग अनुभवले. आता येत्या आठवड्यापासून शनीदेवांची जन्मकथा आणि शनी देव माहात्म्य प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या निमित्ताने ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत ती सूर्यदेवांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. हि भूमिका साकारताना आणि पुन्हा एकदा टेलिव्हिजन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अमृताने उत्सुकता व्यक्त केली आहे.

Leave a Reply