Monday, September 28, 2026
Latest NewsNATIONAL

उत्तर प्रदेशासह, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशातील काही जिल्हे आणि ईशान्यकडील सर्व राज्यात पावसाची शक्यता

पुणे: गेल्या चार-पाच दिवसांपासून बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सध्या सौम्य झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या तीन दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. याचा सर्वाधिक फटका उत्तरेकडील जिल्ह्यांना बसला आहे. नाशिक आणि अकोला जिल्ह्यात कोसळलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे.

सध्या बहुतांशी राज्यांतून मान्सून परतला असला तरी, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर भारत आणि ईशान्यकडील राज्यांत अद्याप मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. उद्या उत्तर प्रदेशासह, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशातील काही जिल्हे आणि ईशान्यकडील सर्व राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading