मंदिर एवढे दिवस का बंद होती याचा सायंटिफिक पद्धतीने अभ्यास करणार -डॉ. भारती पवार यांचा ठाकरे सरकारला टोला
पुणे: कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्या नंतरही राज्यात अनेक दिवस मंदिरे बंद होती. ती उघडावी म्हणून भाजपने आंदोलन केले होते, मंदिरे आता राज्यसरकारने उघडली आहेत. हे मंदिर एवढे दिवस का बंद ठेवली हे शोधण्यासाठी आता सायंटिफिक पद्धतीने अभ्यास करण्याचे काम आमचे चालू आहे, असा टोला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज ठाकरे सरकारला लगावला. पुणे महानगरपालिकेमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना मंदिरे उघडण्याच्या मुद्दयाचे डॉ. पवार समर्थन केले.
या पत्रकार परिषदेला महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते
डॉ. भारती पवार म्हणाल्या, कोरोना चे संकट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण आवश्यक आहे. पुणे महापालिकेने जास्तीत जास्त शहरात लसीकरण केले असून पुणे महापालिके कडून इतर पालिकांनीही प्रेरणा घ्यावी.
कोरोना हा वायरस आहे त्यावर राजकीय विधान करून चालत नाही.यासाठी शास्त्रीय अभ्यास गरजेचा असतो . असेही त्या म्हणाल्या. कोरोनाची दुसरी लाट खूप कमी झाले आहे असे काही लोक व संशोधक म्हणतात त्यावर पवार म्हणाल्या, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण पूर्ण कमी झाले नाहीत,ते कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे लक्ष आहे.
कोरोना हा वायरस प्रत्येकाला होऊ नये यासाठी केंद्र सरकार पुरेपूर काळजी घेत आहे प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
लहान मुलांना कोरोना हा वाढण्याचा भरपूर धोका आहे त्यावर पवार म्हणाल्या, लहान मुलांच्या लसीकरणाबाबतीत सुरक्षा लक्षात घेता अजून चाचण्या सुरू आहेत.. जे व्यक्ती कोरोना रुग्णांच्या जवळून संपर्कात येतात त्यांनाच केंद्र सरकारने विमा दिला आहे .जवळपास ९०० व्यक्तींना हा विमा केंद्र सरकारने प्रदान केला आहे . असे पवार म्हणाल्या,
लसीबाबत पण त्यांनी विधान केले आज माझ्या भारतात लस तयार होतेय. आणि 9 महिन्यात भारत लसीकरणात शंभर कोटीच्या जवळ पोहोचलाय. हा आत्मनिर्भर भारत होवा असे संपूर्ण जगाला वाटते त्याची वाट संपूर्ण जग पाहतंय . असे भारती पवार म्हणाल्या.
