दोशी करंडक निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, अँबिशियस क्रिकेट अकादमी संघांचा सलग दुसरा विजय
पुणे : पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी आणि अँबिशियस क्रिकेट अकादमी या संघांनी सलग दुसरा विजय मिळवला. तर, पुना क्लब संघाने विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील सामन्यात हर्ष ओसवाल(4-28)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुना क्लब संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा 7 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पुना क्लब संघाने 50 षटकात सर्वबाद 223धावा केल्या. यात सागर बिरदवडे 37चेंडूत 6चौकार व 3षटकारासह 5धावा व ओंकार आखाडेने 70 चेंडूत 50धावा केल्या. पीवायसी कडून नचिकेत वेर्लेकर(3-50), साहिल छुरी(3-37), सिद्धांत वीर (2-40), अब्दुस सलाम(1-20) यांनी सुरेख गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाला 50षटकात 9बाद 215धावाच करता आल्या. यात श्रेयश वालेकरने एकाबाजूने लढताना 136 चेंडूत 6चौकार व 2षटकारासह 107धावांची शतकी केली . श्रेयशला , साहिल छुरीने 41 धावा काढून साथ दिली.संघ 6 बाद 23.5षटकात 6बाद 81 धावा असा अडचणीत असताना या दोघांनी सातव्या गड्यासाठी 125 चेंडूत 99 धावांची भागीदारी केली. पुना क्लब कडून हर्ष ओसवाल(4-28), राजकमल चौहान(2-27), विश्वराज शिंदे(1-41) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत यश (नाबाद 90धावा)याने केलेल्या अफलातून फलंदाजींच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 4 गडी राखून पराभव केला. बारणे क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या लढतीत सचिन भोसले(5-32)याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजय मिळवला.
