एमएसएलटीए आयटीएफ वरिष्ठ एस100 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आनंद कोठारी,नितीन कीर्तने यांचा अंतिम फेरीत प्रवेश
मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए आयटीएफ वरिष्ठ एस100 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आनंद कोठारी, नितीन किर्तने या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
45वर्षांवरील पुरुष गटात अव्वल मानांकित नितीन किर्तने याने तिसऱ्या मानांकित जिगर जेटलीला 6-0, 6-1 असे पराभूत केले. दशरथ साळवीने विनायक बेटगिरीला 6-0, 6-1 असे नमविले.
55 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत हिमांशू गोसावीने फिरदोस श्रॉफवर 6-3,6-4 असा विजय मिळवला.
रमझान शेख(भारत)वि.वि.रिषभ मेहता(भारत) 6-2, 6-2;45वर्षांवरील पुरुष गट: उपांत्य फेरी:
नितीन किर्तने(भारत)(1) वि.वि.जिगर जेटली(भारत)(3) 6-0, 6-1;
दशरथ साळवी(भारत)वि.वि.विनायक बेटगिरी(भारत)6-0, 6-1;
55 वर्षांवरील पुरुष गट: उपांत्य फेरी:
हिमांशू गोसावी(भारत)वि.वि.फिरदोस श्रॉफ(भारत) 6-3,6-4;
गजानन कुलकर्णी(भारत)वि.वि.आशिष डिके(भारत)3-6,6-3, 10-5
65 वर्षांवरील गट: उपांत्य फेरी:
विनायक गुजराथी(भारत)(2) वि.वि.एकनाथ किणीकर(भारत)6-4, 7-5.
