Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

शालेय विद्यार्थी वाहतुक संघटनेचे पदाधिकारी व सभासद आत्म्यदहन करणार -पांडुरंग हुमने

पुणे: मार्च 2020 पासून कोविडच्या महामारीमुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी वाहतूकदार यांचा व्यवसाय देशोधडीला मिळाला आहे .व्यवसाय बंद परिणामी कर्जबाजारी होऊन 8 वाहतूकदारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यांची माहिती शासनाला संबधित मंत्री मोहदेय यांना देऊन सुद्धा अशा अत्यंत वाईट परिस्थितीत आमचा कोणीही कसलाही विचार केलेला नाही.म्हणून 22 डिसेंबर 2021 रोजी विधान भवन येथे शालेय विद्यार्थी वाहतुक संघटनेचे पदाधिकारी व सभासद आत्म्यदहन करणार आहेत. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ चे अध्यक्ष पांडूरग हुमने यांनी दिली.


या पत्रकार परिषदेला पांडुरंग आमटे ,देविदास भुजबळ, शशिकांत देशमुख, तानाजी बांदल उपस्थित होते .

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाच्या मागण्या
1) विद्यार्थी वाहतूकदारा साठी कल्याणकारी मंडळ किंवा बोर्ड स्थापन करण्यात यावा.
2) स्कूल बस बंद असल्यामुळे परिवहन विभाग व्यवसाय कर पासिंग फी ही 20/3/2020
ते मार्च 2022 पर्यंत शंभर टक्के माफ करण्यात यावी.
3) फुल बसण्यासाठी बँक व फायनान्स च्या च्या कर्जाची मुदत वाढवून भेटाय व त्यावरील दंड व्याज पुन्हा व्याज माफ करण्यात यावे.
4) शाळा वाहतूकदारांना करार करून देण्यात टाळाटाळ करते त्यामुळे करा रद्द करून पालकांच्या सहमतीने ना हरकत दाखला देणे व तो परिवहन विभागाने ग्राह्य धरून गाडी पासिंग करणे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading