Thursday, July 30, 2026
Latest NewsSports

रणजी क्रिकेटर अवि बारोटचे अवघ्या 29व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नवी दिल्ली : सौराष्ट्रचा फलंदाज अवि बारोट याचं गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने अविचं अकाली निधन झाले. तो 29 वर्षांचा होता. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशने याबाबत माहिती दिली आहे. सौराष्ट्र व्यतिरिक्त, अवी बरोट हरियाणा आणि गुजरातसाठी देखील तो क्रिकेट खेळला होता. तसेच तो टीम इंडियाच्या अंडर -19 संघाचा भाग होता. रणजी क्रिकेट चॅम्पियन संघाचाही तो भाग होता.

 अविच्या जाण्याने दुःख झाले असल्याचे सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये 15 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे अवि बरोटचं निधन झाल्याचं यामध्ये नमूद करण्यात आले आहे. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी झालेल्या रणजी सामन्यात त्याने 45 बॉलमध्ये 72 रन केले होते.  

अवि बरोट एक उत्तम फलंदाज होता. अवि ऑफ-ब्रेक गोलंदाजी तसंच यष्टीरक्षण देखील करायचा. अविने एकूण 38 प्रथम श्रेणी सामने खेळलेत. ज्यात त्याने 1547 धावा केल्या. त्याच वेळी, सुमारे 38 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1030 धावा केल्या गेल्या. केवळ 20 टी -20 सामन्यांमध्ये 717 धावा केल्या. जेव्हा सौराष्ट्राच्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकली तेव्हा अवि बरोट त्या विजयी संघाचा भाग होता. अविने सौराष्ट्रसाठी 21 रणजी सामने, 17 लिस्ट ए सामने, 11 टी -20 सामने खेळले आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading