Tuesday, July 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

Pornography case : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी विरोधात FIR दाखल

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे गेल्या काही काळापासून चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अभिनेत्री शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात लैंगिक छळ आणि फसवणुकीसारखे गंभीर आरोप केले असून पोलीसात एफआयआर दाखल केला आहे. शर्लिनने 14 ऑक्टोबर रोजी राज आणि शिल्पाविरोधात एफआयआर दाखल केला आहे.  

प्रसारमाध्यमांशी बोलताना शर्लिन म्हणाली की, मी राज कुंद्राविरोधात लैंगिक छळ, फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. त्यांनी मला अंडरवर्ल्डची धमकी दिली. राज कुंद्रा विषयी बोलताना ती म्हणाली, त्यांनी माझे लैंगिक शोषण केले आहे हे त्यांनी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवले पाहिजे, तुम्ही मुलींना त्यांचे शरीर पाहून पेमेंट का देत नाही? तुम्ही त्यांना फसवता. कलाकाराच्या घरी जाऊन अंडरवर्ल्डची धमकी देता. की, लैंगिक अत्याचाराचे प्रकरण मागे घे अन्यथा तुमचे आयुष्य उध्वस्त करू’ या विरोधात मी पोलीसात एफआयआर दाखल केला आहे. 

 दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. त्यातच शर्लिन चोप्रा हिने त्याच्यावर गंभीर आरोप केल्याने अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading