दुहेरीत राधिका कानिटकर व प्रियांका मेहता,अमनदीप सिंग कोहली व वर्धन शहा यांना विजेतेपद
एकेरीत नितीन किर्तने, हिमांशू गोसावी, विनायक गुजराथी, राधिका कानिटकर यांना दुहेरी मुकुटाची संधी;
मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए)यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए आयटीएफ वरिष्ठ एस100 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरीत राधिका कानिटकर व प्रियांका मेहता,अमनदीप सिंग कोहली व वर्धन शहा यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डॉ.जी.ए. रानडे टेनिस सेंटर, मुंबई येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत दुहेरीत 35 वर्षांवरील पुरुष गटातअमनदीप सिंग कोहली व वर्धन शहा या जोडीने आकाश काळे व विमल रॉय यांचा 6-1, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर याच महिला गटात राउंड रॉबिन फेरीत राधिका कानिटकर व प्रियांका मेहता या जोडीने 2गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद पटकावले.
दुहेरी 45 वर्षावरील गटात अंतिम फेरीत नितीन किर्तनेने निखिल रावच्या साथीत सुधीर गोथे व दशरथ साळवीयांचा 6-0, 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. दुहेरी 55 वर्षावरील गटात राउंड रॉबिन फेरीत हिमांशू गोसावी व भूषण आकूत या जोडीने 2 गुणांसह विजेतेपद पटकावले. 65 वर्षांवरील गटात राउंड रॉबिन फेरीत विनायक गुजराथी व मुर्थती सुरेश यांनी 2गुणांसह विजेतेपदाचा मान पटकावला.
एकेरीत उपांत्य फेरीत 35 वर्षांवरील पुरुष एकेरी गटात बिगरमानांकीत आनंद कोठारीने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित दत्ता रेवांतचा 7-5, 3-6, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. रमझान शेखने रिषभ मेहताचे आव्हान 6-2, 6-2 असे संपुष्ठात आणले.
45वर्षांवरील पुरुष गटात अव्वल मानांकित नितीन किर्तने याने तिसऱ्या मानांकित जिगर जेटलीला 6-0, 6-1 असे पराभूत केले. दशरथ साळवीने विनायक बेटगिरीला 6-0, 6-1 असे नमविले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, मुंबई जिल्हा टेनिस संघटनेचे सदस्य सागर इंजिनियर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा निरीक्षक लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 35 अधिक पुरुष गट: उपांत्य फेरी:
आनंद कोठारी(भारत)वि.वि.दत्ता रेवांत(भारत)(3) 7-5, 3-6, 6-4;
रमझान शेख(भारत)वि.वि.रिषभ मेहता(भारत) 6-2, 6-2;
रमझान शेख(भारत)वि.वि.रिषभ मेहता(भारत) 6-2, 6-2;
45वर्षांवरील पुरुष गट: उपांत्य फेरी:
नितीन किर्तने(भारत)(1) वि.वि.जिगर जेटली(भारत)(3) 6-0, 6-1;
दशरथ साळवी(भारत)वि.वि.विनायक बेटगिरी(भारत)6-0, 6-1;
नितीन किर्तने(भारत)(1) वि.वि.जिगर जेटली(भारत)(3) 6-0, 6-1;
दशरथ साळवी(भारत)वि.वि.विनायक बेटगिरी(भारत)6-0, 6-1;
55 वर्षांवरील पुरुष गट: उपांत्य फेरी:
हिमांशू गोसावी(भारत)वि.वि.फिरदोस श्रॉफ(भारत) 6-3,6-4;
गजानन कुलकर्णी(भारत)वि.वि.आशिष डिके(भारत)3-6,6-3, 10-5
65 वर्षांवरील गट: उपांत्य फेरी:
राजीव वालिया(भारत)वि.वि. ताहीर अली(भारत)(3) 6-3, 6-4;
विनायक गुजराथी(भारत)(2) वि.वि.एकनाथ किणीकर(भारत)6-4, 7-5.
विनायक गुजराथी(भारत)(2) वि.वि.एकनाथ किणीकर(भारत)6-4, 7-5.
दुहेरी गट: पुरुष 35 वर्षांवरील गट: उपांत्य फेरी:
अमनदीप सिंग कोहली(भारत)/वर्धन शहा(भारत)वि.वि.इंतिकाब अली(भारत)/आशुतोष गोयल(भारत)6-0, 6-1;
आकाश काळे(भारत)/विमल रॉय(भारत)[3] वि.वि.तारीख अन्सारी(भारत)/रमझान शेख(भारत) 6-1, 6-2;
अंतिम फेरी:अमनदीप सिंग कोहली(भारत)/वर्धन शहा(भारत)वि.वि. आकाश काळे(भारत)/विमल रॉय(भारत)[3] 6-1, 6-0;

महिला 35 वर्षावरील दुहेरी गट: राउंड रॉबिन:
विजेती: राधिका कानिटकर(भारत)/प्रियांका मेहता( भारत)(2गुण);
उपविजेती: ज्योत्स्ना डी(भारत)/नाझनीन रेहमान(भारत)(1गुण);
उपविजेती: ज्योत्स्ना डी(भारत)/नाझनीन रेहमान(भारत)(1गुण);
दुहेरी 45 वर्षावरील: उपांत्य फेरी:
नितीन किर्तने(भारत)/निखिल राव(भारत)[1] वि.वि.श्रीपाल जैन(भारत)/विपुल वर्मा(भारत)6-0, 6-2′
सुधीर गोथे(भारत)/दशरथ साळवी(भारत)[2] वि.वि.विनायक बेटगिरी(भारत)/दिनेश लौगनी(भारत)6-1, 6-4;
अंतिम फेरी: नितीन किर्तने(भारत)/निखिल राव(भारत)[1] वि.वि. सुधीर गोथे(भारत)/दशरथ साळवी(भारत)[2] 6-0, 6-2;
सुधीर गोथे(भारत)/दशरथ साळवी(भारत)[2] वि.वि.विनायक बेटगिरी(भारत)/दिनेश लौगनी(भारत)6-1, 6-4;
अंतिम फेरी: नितीन किर्तने(भारत)/निखिल राव(भारत)[1] वि.वि. सुधीर गोथे(भारत)/दशरथ साळवी(भारत)[2] 6-0, 6-2;
दुहेरी 55 वर्षावरील: राउंड रॉबिन:
विजेता: हिमांशू गोसावी(भारत)/भूषण आकूत(भारत)(2गुण);
उपविजेता: आशिष डिके(भारत)/गजानन कुलकर्णी(भारत)(1गुण);
विजेता: हिमांशू गोसावी(भारत)/भूषण आकूत(भारत)(2गुण);
उपविजेता: आशिष डिके(भारत)/गजानन कुलकर्णी(भारत)(1गुण);
पुरुष 65 वर्षांवरील दुहेरी गट: राउंड रॉबिन:
विजेता: विनायक गुजराथी/मुर्थती सुरेश(भारत)(2गुण)
उपविजेता: एकनाथ किणीकर/धवल पटेल(1गुण).
उपविजेता: एकनाथ किणीकर/धवल पटेल(1गुण).