Thursday, November 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोजागिरी काळात तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी तर उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश बंदी

उस्मानाबाद : साडेतीन शक्तीपिठा पैकी एक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील मंदिरात नवरात्रौत्सव काळात भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. ही गर्दी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कायम असते. ही वाढती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्या प्रशासनाने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी लागू असणार आहे. तर तुळजापूर शहरात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ही माहिती आज दिली.

कोजागिरी पौर्णिमेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात. या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात होणारी गर्दी टाळण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा काळात 18, 19 आणि 20 ऑक्टोबर या 3 दिवस एकही वाहन किंवा भाविक जिल्हात येऊ दिला जाणार नाही, असे  जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

परराज्यातील भाविकांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक

परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण झालेले नाही अशा राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासाच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे. यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे 2 डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले होते.

 

Leave a Reply