Tuesday, July 28, 2026
Latest NewsPUNE

कंत्राटी कर्मचारी पाच महिने विना वेतन; संबंधीत ठेकेदाराला पालिका देणार नोटीस

पुणे: महापालिकेने नागरी सुविधा केंद्रासाठी कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या जवळपास शंभर कर्मचार्‍यांना गेली पाच महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण्यात यावे, अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. दरम्यान, कर्मचार्‍यांचे वेतन थकविणार्‍या ठेकेदारास नोटीस देण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी सांगितले आहे.

महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी नागरी सुविधा केंद्र चालवली जातात. या केंद्रांमध्ये प्रामुख्याने कर भरणा करून घेतला जातो. कर भरण्यासाठी नागरिकांनी महापालिकेत न येता आपापल्या भागातच सेवा मिळावी, हा यामागचा हेतू आहे. या कामासाठी मार्च महिन्यात कंत्राटी पद्धतीने 100 कर्मचार्‍यांची नेमणुक केली आहे. हे कर्मचारी शहरात्या विविध केंद्रामध्ये व कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. यातील काही कर्मचारी नुकत्याच महापालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांमध्येही कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी कोरोनाच्या काळातही प्रशासनाच्या सोयीनुसार सेवा देत होते.  मात्र, या कर्मचार्‍यांना मागील पाच महिन्यापासून वेतनच मिळालेले नाही. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात कर्मचार्‍यांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात संबंधीत ठेकेदारास नोटीस देवून त्वरीत वेतन देण्याच्या सूचना करण्यात येतील, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी सांगितले आहे.

महापालिका प्रशासनाकडे कर्मचार्‍यांच्या पगाराची चार बिले प्रलंबीत आहेत. थकीत बिलांची रक्कम मिळण्यासाठी महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे वारंवार पाठपुराव केला. मात्र त्याची पुर्तता अद्याप झालेली नाही. मात्र, प्रशासनाकडून बीलाची रक्कम मिळो अथवा न मिळो, दिवाळीचा विचार करून आठवडाभरात कर्मचार्‍यांना थकीत वेतन दिले जाईल, अशी ग्वाही संबंधीत ठेकेदाराने दिली आह

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading