Tuesday, July 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत राज्य सरकार अस्‍थिर करण्‍याचा प्रयत्‍न- शरद पवार

पिंपरी : आता राज्‍यातील सरकार स्‍थिर आहे. त्‍यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत राज्य सरकार अस्‍थिर करण्‍याचा प्रयत्‍न सुरु आहे. तुम्‍ही दवाबतंत्राचा वापर करा, छापे टाका. तुम्‍ही काहीही करु शकता. तरीही आघाडी सरकार आपलाकार्यकाळ पूर्ण करेलच, असा विश्‍वास शरद पवार यांनी आज व्‍यक्‍त केला.

आज पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी अध्यक्ष  शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तीन बहिणी, त्यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आणि  पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून  छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा यावरही भाष्य केले.  यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले,  तुम्‍ही काहीही करा, हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेलकाहींनी ‘मी पुन्‍हा येणार’, अशा घोषणा दिल्‍या. मात्र त्‍यांचे स्‍वप्‍न पूर्ण झाले नाही. सीबीआय, ईडी, आयकर विभागाचा गैरवापर होत आहे. जे सरकार केंद्र सरकारच्‍या विचारांचे नाही, त्‍या सरकारला या यंत्रणेच्‍या वापर महाराष्‍ट्र, तामिळनाडू, प. बंगालमधील सरकार अस्‍थिर करण्‍यासाठी होत आहे. लोकप्रतिनिधी दडपणाखाली ठेवण्‍यासाठी काम सुरु आहे. 

छापा टाकला की पाच दिवस पाहुणचार घेतला, अजित पवारांच्‍या तीन बहिणीच्‍या मालमतेवर छापा टाकण्‍यात आले. छापा टाकणारे घरात एक ते दोन दिवस राहिले ठीक आहे. पण पाच दिवस १५ माणसांनी छापा टाकला. त्‍यांचे वागणे बरोबर होते. तुम्‍हीच तिथेच थांबवले, असा आदेश त्‍यांना फोनवरुन येत होतो. एखाद्‍याच्‍या घरी १५ माणसं पाठवणे योग्‍य आहे का, चौकशी करण्‍याचा अधिकार आहे. काम संपल्‍यानंतर किती दिवस पाहुचार किती दिवस करणार, वरुन आदेश असल्‍यामुळे ही मंडळी पाच दिवस बसून होती, असेही पवार यावेळी म्‍हणाले.

मनी लाँड्रिंग  प्रकरणी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्या निवासस्थानी विविध ठिकाणी सीबीआयने  छापेमारी केली होती. त्यामुळे अनिल देशमुख  यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला .अनिल देशमुखांना आम्ही सत्तेपासून लांब होण्याचे आदेश दिले .असे शरद पवार म्हणाले. तसेच राज्यात सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनाचा होईल हे सर्वांनी एकमताने मान्य केल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading