Saturday, September 26, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्यापासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

पुणे: नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थातच मान्सूनने काल महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. काल मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातून मान्सून परतला असल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं आहे. राज्यात यावर्षी 4 महिने 9 दिवस पाऊस कोसळला आहे. दोन दिवस आधी महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने यावर्षी एक दिवस आधीच महाराष्ट्रात काढता पाय घेतला आहे. दरम्यान गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण उद्यापासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

खरंतर, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या 48 तासांत ओडिशा व अनेक राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून उद्या मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या दहा जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading