वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त संजय तांबे यांचा सन्मान
पुणे : भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती तथा वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त कर्तव्य फाउंडेशनतर्फे पुणे लष्कर भागातील महावीर चौक येथील वृत्तपत्र विक्रेते संजय तांबे यांचा बापूसाहेब गानला यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळेस फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख, मोहसीन शेख, दिलीप भिकुले आदी उपस्थित होते.
संजय तांबे हे कॅम्पातील कुंभारबावडी येथील रहिवाशी असून ते गेली ४० वर्षांपासून कॅम्प भागात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. ते अत्यंत प्रामाणिक व मेहनती असून त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. महावीर चौक येथील लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांनाही ते सहकार्य व मार्गदर्शन करतात. फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी त्यांना वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
