‘प्लॅनेट मराठी’च्या ‘प्लॅनेट टॅलेंट’ ची नवरत्ने चमकली!

नवरंगांची उधळण करणारा आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा नवरात्रोत्सव सुरु झाला याच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी’ने आपल्या ‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये सहभागी झालेल्या एकेक रत्नांना आपल्या समोर आणले आहे. या नवरत्नांमध्ये सोनाली खरे, सुरभी हांडे, नेहा शितोळे, भाग्यश्री मिलिंद, रेशम श्रीवर्धनकर, पर्ण पेठे, दीप्ती देवी, ऋतुजा बागवे आणि प्रार्थना बेहेरेचा सहभाग आहे. त्यामुळे आता ‘प्लॅनेट टॅलेंट’च्या परिवारात अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, गायत्री दातार, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, संजय जाधव, प्राजक्ता माळी, शिवानी बावकर, निखिल चव्हाण, सायली संजीव यांच्यासह या नवरत्नांची नावेही जोडली गेली आहेत.

‘प्लॅनेट टॅलेंट’मधील या नवरत्नांबद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर सांगतात, ”आम्हाला खूप आनंद आहे की, ही नवरत्ने नवरात्रीच्या निमित्ताने आमच्या परिवारात सहभागी होत आहेत. मुळात ही सर्व नवरत्ने नावाजलेली असून त्यांना यशाच्या उंच शिखरावर नेण्याची जबाबदारी आमची आहे. यापूर्वी ‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये सहभागी झालेल्या कलाकारांमुळे आम्हाला आणि त्यांना स्वतःलाही खूप फायदा झाला आहे. आम्हाला खात्री आहे, या नवरत्नांनाही आमच्याकडून पूर्ण सहकार्य लाभेल.”

Leave a Reply

%d bloggers like this: