Tuesday, July 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीन

ठाणे : गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक करण्यात आले.   त्यानंतर ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना जामीन दिल्याची माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी आज दुपारी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर दुपारी ठाणे न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांचा जामीन मंजूर केला.

अनंतर करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात कलम ३६५, ३२४, १४३, १४७, १४८, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेऊन वर्तकनगर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आणि त्यानंतर आव्हाड यांना अटक करून ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. ठाणे न्यायालयाने आव्हाड यांना १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

दरम्यान,  गेले १४ महिने ठाकरे सरकारला जितेंद्र आव्हान यांना वाचवत होती. अखेर गुंड मंत्री जितेंद्र आव्हाड याची अटक झाली. आता अशा गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नये. या माणसाने मंत्री असून अपहरण केले, मारहाण केली. सव्वा वर्षानंतर न्यायालयाने न्याय देऊन जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याचे आदेश दिले. ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली आणि शेवटी करमुसेला न्याय मिळाला, असे भाजप नेते किरीट सोमय्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

काय आहे प्रकरण?

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट टाकल्याचा आरोप करत इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्यावेळी मंत्री आव्हाड तिथे उपस्थित असल्याचे करमुसे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री करमुसे यांना घरातून आव्हाडांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तीन पोलीस शिपायांनी नेले होते. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोंद झाली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading