Friday, September 25, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

आर्यन खानच्या जामीन अर्जावर न्यायालय २० ऑक्टोबरला देणार निकाल

मुंबई : क्रूझ ड्रग्स प्रकरण अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली असून येत्या २० ऑक्टोबरला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे कोठडीतील आर्यन खानचा मुक्काम वाढला आहे.

क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपी असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तसेच इतर दोन आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड. अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. त्यांनी पूर्ण क्षमतेने आर्यन खानची बाजू मांडून त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी केली. तर एनसीबीच्या वकिलांनी त्यांच्या जामिला विरोध केला. दुपारी एक वाजपल्यापासून एनसीबीच्या वकिलांचा युक्तीवाद सुरु होता. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने आपाला निकाल राखून ठेवला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading