दसरा-दिवाळी वाचन जागर महोत्सव; 11 प्रकाशकांची एकत्रितपणे आखलेली अभिनव योजना

पुणे: ज्या समाजाचा प्रवास वाचाल तर समृद्ध व्हाल या प्रगत जाणीवे पर्यंत होतो. त्या समाजाची सांस्कृतिक समृद्धी नक्की असते हे तर सर्वज्ञात आहे. असा सजग एक समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील उत्तम साहित्य निर्मिती साठी कटिबद्ध असलेले नामवंत प्रकाशक यांनी एकत्र येऊन वाचन जागर अभियान सुरू केले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत वाचन जागर अभियान चे प्रमुख रोहन चंपानेरकर यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला आशिष पाटकर , रोहन जोशी उपस्थित होते. रोहन चंपानेरकर म्हणाले, केवळ ग्रंथविक्री उद्दिष्ट न होता. एकूण वाचनाविषयी आवड निर्माण करणे. वाचन संस्कृतीचे संवर्धन हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे .या अभियानाअंतर्गत आम्ही या आधी तीन ग्रंथमहोत्सव महाराष्ट्रात भरलवले आहेत. आणि त्याला रसिक वाहनांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे.असे रोहन चंपानेरकर म्हणाले.

आशिष पाटकर म्हणाले, दसरा-दिवाळी वाचन जागर महोत्सव मध्ये, मेहता पब्लिशिंग हाऊस, मनोविकास प्रकाशन, रोहन प्रकाशन, डायमंड पब्लिकेशन, ज्योत्स्ना प्रकाशन, मॅजेस्टिक प्रकाशन, साकेत प्रकाशन, साधना प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, राजहंस प्रकाशन, पद्मगंधा  प्रकाशन यांनी सहभाग घेतला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: