Shocking : पुण्यात एकतर्फी प्रेमातून 13 वर्षीय कब्बडीपटू मुलीची खेळताना निर्घुण हत्या

पुणे : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने 13 वर्षांच्या कब्बडी पटूची खेळतानाच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील बिबेबाडी परिसरातील यश लॉन्स येथे बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना या ठिकाणी लहान मुले कबड्डीचा सराव करीत होती. तसेच नागरिक चालण्याचा व्यायाम करीत होते. हा थरार पाहून सर्व जण तिथून पळाले.  नात्यातील तरुणानेच धारदार कोयत्याने या मुलीच्या मानेवर वार करून खून केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 13) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. तर शुभम भागवत (वय 25) असे आरोपीचे नाव आहे. क्षितीजाचे वडील अनंत व्यवहारे यांचा स्कुल व्हॅनचा व्यवसाय आहे. आरोपी शुभम हा त्यांच्या भावाच्या साडूचा मुलगा आहे. क्षितिजा ही आठविमध्ये शिकत होती. ती उत्तम कबड्डी खेळाडू होती. ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. यावेळी शुभम व त्याच्या साथीदाराने क्षितिजाला  बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण दोघांमध्ये यावेळी वाद झाला. तेव्हा शुभमने सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर सपासप वार केले. हे वार इतके भीषण होते की धडापासून मुंडके वेगळे करण्याचा आरोपीचा प्रयत्न आसावा असे घटनास्थळी झालेल्या पंचनाम्यामधून दिसून येते. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी कोयता आणि अन्य शस्त्र तेथेच टाकून फरार  झाले आहेत. यावेळी त्यांच्याकडे पिस्तुलही होते.    

 

Leave a Reply

%d bloggers like this: