अभाविपच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग अध्यक्ष हर्ष चव्हाण यांची भेट.

गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या सात दशकापासून विद्यार्थी हित व समाजहिताचे काम अविरतपणे करत आहे, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हाण हे गडचिरोली येथे कार्यक्रमानिमित्त आले असता अभाविपच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन जनजाति विषयावरील सविस्तर चर्चा केली. 

यावेळी हर्ष चव्हाण यांनी जनजाति क्षेत्रांमध्ये आम्ही आरोग्य व शिक्षण या व्यवस्थेकडे अधिक भर दिल्याचे सांगितले तसेच येणाऱ्या काळात जनजाति विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे देऊन त्यांना स्वयंरोजगार कसे करता येईल, तसेच नवीन शिक्षा नीति यामध्ये जनजाती विषयावरील अभ्यास विद्यार्थ्यांनपर्यंत कसा पोहचेल याविषयी आयोग लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी अभाविपच्या शिष्टमंडळाने ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाची स्मरणिका भेट दिली यावेळी केंद्रीय कार्यासमिती सदस्य अमित पटले, प्रांत सहमंत्री अभिषेक देवर, प्रांत जनजाती कार्य सह निमंत्रक अमोल मदने, जिल्हा संयोजक प्रवीण गिलबिले, अंकूश कुनघाडकर, विभाग संघटन मंत्री शक्ती केराम, जिल्हा सह संयोजक यश गण्यारपवार, वडसा भाग संयोजक अक्षय कोकोडे नगरमंत्री जयेश ठाकरे, सहमंत्री तुषार चूधरी, हिरालाल नुरुती, बबिता किरंगे, अक्षदा कुडमेथे, विशाल हुर्रा, अविनाश मडावी, मंगल मडावी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: