सावरकर, पासलकर प्रकल्पांसाठी महापालिकेचे संयुक्त प्रकल्प

पुणे : कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारक आणि सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक अनुक्रमे विवेक व्यासपीठ आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान या संस्थांबरोबर पुणे महापालिकेला ३० वर्षांसाठी संयुक्त प्रकल्प राबविण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, सावरकर स्मारकात सावरकर अध्यासन केंद्राद्वारे सावरकरांच्या जीवन कार्याची ओळख करून देणारा माहितीपट, प्रदर्शनी, ग्रंथालय, साहित्य विक्री केंद्र, शोधनिबंध, नाट्यप्रयोग आणि प्रबोधन व प्रशिक्षण आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

रासने पुढे म्हणाले, सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारकामध्ये इतिहास संशाधेन, शिव शंभू विचार दर्शन प्रकल्प, वीर बाजी पासलकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणे, व्याख्यानमाला, विशेष मुलाखती, विशेष प्रशिक्षण वर्ग, ग्रंथालय, प्रबोधन आणि प्रशिक्षण आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: