पी.डी पाटील यांच्या व्यक्तिमत्वात कर्तृत्व आणि दातृत्वाचा संगम – सुशीलकुमार शिंदे

पुणेः- समाजात अब्जाधिशांशी कमी नाही परंतू समाजाप्रति संवेदना जागृत ठेऊन त्यांच्या विषयी कर्तव्य भावना आणि समाजाचे आपण काही ऋण देणे लागतो या भावनेपोटी जी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी थोडी लोक आहेत त्यात पी.डी.पाटील यांचे नाव येते. पी.डी.पाटील यांच्या
व्यक्तिमत्वाचे वर्णन करावयाचे झाल्यास कर्तत्व आणि दातृत्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्वात संगम दिसून येतो असे मत भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

समाजात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीस दरवर्षी रंगत-संगत प्रतिष्ठान तर्फे जिंदादिल पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीचा म्हणजेच 2021 च्या रोप्यमहोत्सवी वर्षाचा जिंदादिल पुरस्काराने डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी.डी. पाटील यांना भारताचे माझी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी शिंदे बोलत होते. 5000 रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी व्यासपीठावर रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर, मैथली आडकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी आणि स्ट्रॅजिक फोर साईट ग्रुप या थिंक टॅंक चे सनियर प्रोग्राम अॅडव्हायझर सचिन इटकर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, कोविड काळ हा सर्वांसाठी आव्हानात्मक काळ होता. पंरतू याच आव्हानात्मक काळात पी.डी.पाटील यांनी त्यांची अत्याधुनिक दोन्ही रुग्णालय महानगरपालिकेला स्वाधिक केली आणि योध्याप्रमाणे पी.डी.पाटील आणि त्यांचा संपूर्ण संघ प्रत्यक्ष मैदानात उतरला आणि अनेकाचे ते तारणहार ठरले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना आयोजनाच पी.डी. पाटील यांनी चुणूक दाखवली तसेच कोविड साऱख्या कठीन काळात देखील त्यांनी त्यांचे नेतृत्व सिद्ध केले.

 प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, पी.डी पाटील यांनी ख-या अर्थाने समाजभिमूख काम केले. समाज आणि विद्यापीठ यांच्यात भिंती उभ्या राहिल्या तर संवाद साधला जाणार नाही हे ओळखून पी.डी. पाटील यांनी समाजाला केंद्र स्थानी ठेऊन कार्य उभे केले. पी.डीं. पाटील यांनी सदैव व्यक्ति पेक्षा समिष्टिंचा विचार केला. पी.डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्वात उमदेपणा, खेळाडूवृत्ती आणि संवेदनशीलतेचा मिलाफ दिसतो.त्यांनी बडोदा, उस्मनाबाद, बृहन् महाराष्ट्रातील अनेक साहित्य संस्थांना भरीव मदत केली आहे. साहित्य चळवळ अधिक बळकट झाली पाहिजे या एकमेव सद्हेतून पी.डी.पाटील यांनी 89 व्य साहित्य संमेलनात सहभागी कवीं पासून माजी संमेलन अध्यक्षांपासून सर्वांचा यथोचित सन्मान केला.

 

Leave a Reply

%d bloggers like this: