इकोमॅन कंपनीवर वसुलीचा दावा दाखल करण्यास मान्यता

पुणे : शहरात निर्माण होणार्या ओल्या कचर्यावर विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी थर्मल कम्पोस्टिंग या तंत्रज्ञानावर आधारित दहा प्रकल्प इकोमॅन इंव्हायरो सोल्यूशन या कंपनीने उभारले होते. हे प्रकल्प अयशस्वी ठरले असून, ते कार्यान्वित नाही. त्यामुळे या कंपनीवर ९ कोटी ७१ लाख रुपये आणि बारा टक्के व्याज असा वसुलीचा दावा दाखल करण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, इकोमॅन कंपनीने ओल्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी तीन मेट्रिक टन क्षमतेचे दोन आणि पाच मेट्रिक टन क्षमतेचे आठ असे दहा प्रकल्प उभारले होते. प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून पाच वर्षांसाठी प्रकल्पाची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी टाकण्यात आली होती. प्रकल्प कार्यान्वित झाला नसल्याने कचर्यावर प्रक्रिया होऊ शकलेली नाही.

 

Leave a Reply

%d bloggers like this: