कोकण आणि मध्य महाराष्ट्रातात येत्या २४ तासात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता
पुणे : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकांनाहून मान्सूनने काढता पाय घेतला असला तरी जाता जाता चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पहायला मिळत आहे. येत्या २४ तासात राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे. तर शनिवारी विदर्भातील काही भागात देखील अशाच स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग,रायगड तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे, वाशिक जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर शनिवारी १६ ऑक्टोबरला वर्धा, नागपूर,भंडारा, गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जळगावासह काही भागात १६ व १७ ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईसह पुण्यात काल संध्याकाळपासून ढगांच्या गडगडासह पावसाने हजेरी लावली होती. गेल्या २४ तासात पुण्यात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई ठाण्यातही मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे.
