Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

खडकवासला विधानसभा महा विकास आघाडीच्या वतीने पदयात्रा

पुणे : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय ग्रह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत कुर पद्धतीने गाडीखाली चिरडून मारले या शेतकरी हत्याकांडाचा निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने आज सोमवार अकरा तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती खडकवासला विधानसभा महा विकास आघाडीच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ भव्य निषेध पदयात्रा धायरी गावातील भैरवनाथ मंदिर येथून वडगाव हायवे पुलाखाली पदयात्रा केंद्र सरकार विरोधी मोठ्याप्रमाणात घोषणा देत पोचल्यानंतर निषेध आंदोलन सभा घेण्यात आली. 

या ठिकाणी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील खडकवासला विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण खडकवासला विधानसभा काँग्रेस कमिटीचे काँग्रेसचेअध्यक्ष राहुल मते पाटील शिवसेनेचे खडकवासला अध्यक्ष नितीन वाघ यांची भाषणे झाली याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती-जमातीच्या उपाध्यक्ष अर्चना शहा हवेली तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रघुनाथ दादा यादव हवेली तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय बापू लगड पुणे महानगरपालिका वृक्ष संवर्धन समितीचे माजी सदस्य मिलिंद पोकळे पाटील पुणे शहर क्रीडा सेलचे उपाध्यक्ष धनंजय पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबराव मते शंकर राव रायकर राजाभाऊ कुंभार तसेच महा विकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading