Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

बसपा च्या वतीने कांशीराम यांना अभिवादन

पुणे : बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने बामसेफ,डी.एस.फोर. बुध्दीस्ट रिसर्च सेंटर, बहुजन समाज पार्टीचे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या १५‌ व्या परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील मा बामसेफ सहकारी आर आर धनविजय, मा रमाकांत खंडे, मा राजु पवार, चंद्रकांत शिंदे, धम्मप्रचारक अरविंद लिंबा जगताप यांचा बसपाच्या चळवळीतील योगदान बद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी बसपाच्या परिवारामध्ये मा डॉ हृदयमित्र किशोर शहाणे सर, मा गणेश अंबारे, मा करपाल वाल्मिकी यांनी प्रवेश केला. बसपा नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.


अभिवादन सभेस प्रमुख मार्गदर्शक सुदीप जी गायकवाड,महासचिव महाराष्ट्र प्रदेश,ओबीसी नेते बापुसाहेब कुदळे, पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी पुणे जिल्हा प्रभारी मेहमूद जकाते, रमेश गायकवाड, अतुल सोनवणे,प्रदीप ओव्हाळ, पुणे जिल्हा महासचिव प्रकाश गायकवाड, पुणे शहर युवा नेते सोनुभाऊ निकाळजे, पुणे जिल्हा सचिव सुनील चव्हाण, चंद्रकांत कांबळे, दिपक बलाढे, पुणे जिल्हा सचिव विजय मिसळे, दिनेश ससाणे, मधुकर इंगळे,पुणे जिल्हा कार्य सचिव क्रांतीकुमार दणाणे, पुणे शहर महासचिव सागर खंडे पुणे शहर कोषाध्यक्ष रामलिंग सोनवणे ॲड बळीराम गायकवाड तसेच सर्व पुणे शहर,विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व जबाबदार पदाधिकारी यांनी बसपा वाढविण्यासाठी तन मन धन व वेळ देण्याची शपथ घेतली व आगामी निवडणुकीत बसपाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेण्याचा संकल्प केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading