Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

नवीन पिढीने सजग राहून संगीत अभ्यास करावा – डॉ. सलील कुलकर्णी

पुणे : संगीत क्षेत्रात रोज नवे बदल होत  आहेत, अशा वेळी नवीन पिढीने सजगतेने संगीताकडे बघून तसा अभ्यास करणे गरजेचे आहे असे मत गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक  डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ग्लोबल स्टार फाउंडेशन आणि इंडियन टॅलेंट सर्च अकॅडमी पुणे यांच्या वतीने डॉ.सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार सोहळ्याचे अायाेजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे  करण्यात आले हाेते. यावेळी ते बोलत होते. भारती विद्यापीठ परफॉर्मिंग आर्टचे संचालक शारंगधर साठे, मुरुडकर फेटेवालेचे गिरीश मुरुडकर, चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे संजय देशपांडे, प्रज्ञा देशपांडे ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे प्रमुख कार्यवाहक प्रमोद रणनवरे, चंदूकाका सराफचे मार्केटिंग हेड कुमार राठोड, वैभव नरंगुदे, संस्थेच्या संस्थापिका  सारिका दीक्षित आणि प्रमुख कार्यवाहक वृषाली कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

यावेळी  संगीत साधना पुरस्कार गायिका- संगीतकार अमिता घुगरी यांना देण्यात आला. आदर्श शाळा पुरस्काराने  शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सासवडला गौरविण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्कार रमेश मारणे, संजीव बागुल आणि विद्या बागुल यांना प्रदान करण्यात आला. तसेच आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने महेश विदयालय मराठी माध्यम कोथरूडच्या  जान्हवी अजोतीकर  यांना  सन्मानित करण्यात आले

डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, जो आनंद प्रत्यक्ष कार्यक्रमात आहे तो ऑनलाइन कार्यक्रमात नाही, आता नव्या उमेदीने कलाकारांनी पुन्हा आपली कला उपासना चालू ठेवावी. शिक्षकांना अनेक पुरस्कार दिले जातात परंतु तरीही, त्यांना कमी प्रमाणात त्यांच्या कामाचे श्रेय दिले  जाते असे मला वाटते. कारण शाळा आणि कॉलेजमधले शिक्षकच सगळं काही घडवतात. त्यामुळे त्यांना योग्य श्रेय दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

ग्लोबल स्टार फाउंडेशनच्या कलाकारांनी स्वरसलील ही सलील कुलकर्णी यांच्या गाण्याची मैफल सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश रसाळ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सारिका दीक्षित यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading