महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सेक्रेटरीपदी श्रीरंगराव चव्हाण पाटील
पुणे : काँग्रेसचे जेष्ठ नेते व प्रदेश सदस्य श्रीरंगराव चव्हाण पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सेक्रेटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी चव्हाण पाटील यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले आहे.
सेक्रेटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते चव्हाण पाटील यांचा सन्मान करण्यात आला.त्या वेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीरंगराव चव्हाण पाटील म्हणाले , काँग्रेसचे गाव ,मोहल्ला पातळीवर संघटना वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसला जनतेचा पाठिंबा वाढला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.
