Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – लखीमपूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीची निर्धार सभा

पुणे: मागील आठवड्यात उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका केंद्रीय मंत्राच्या मुलाने 8 शेतकऱ्यांना चिरडले या घटनेच्या निषेधार्थ  महाविकास आघाडीतील घटक पक्ष व शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या वतीने आज महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन केले होते, यामध्ये पुण्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्धार सभा संपन्न झाली. 

पुणे शहरात मार्केट याड व विविध ठिकाणे बंद ठेवले आहेत. आज पुण्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष व शेतकरी बचाव  कृती समितीच्या वतीने  निर्धार सभेचे आयोजन केले आहे. ही सभा पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे घेण्यात आली. या सभेत लखीमपूर येथील दुर्घटनेचा महाविकास आघाडीतील घटक पक्ष व शेतकरी बचाव  कृती समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागबे,महानगरपालिका गटनेते अरविंद शिंदे, काँग्रेसचे नगरसेवक अभय घाजेड,रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी,राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी महापौर दीपक मानकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,नितीन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष मूणाल वानी, पुणे महानगरपालिकेतील काँग्रेसचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते व विविध पक्षातिल नेते ,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, शिवसेना, जनता दल,शेतकरी कामगार पक्ष ,आम आदमी पक्ष उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले,आज लखीमपूर येथील दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी तल्या घटक पक्षानी पुणे शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले. या बंद ला मार्केट यार्ड येथील व्यावसायीक,व दुकानदारानी बंद व्यवशी पाळला.
त्याबद्दल त्याचे आभार मानतो असे प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply